एपीएमसी बद्दल

जयप्रकाश मार्केट यार्ड
विदभातील अग्रगन्य बाजार समिती

कृषि उत्पन्न बाजार समिती, तुमसरची स्थापना सन 1963 मध्ये झाली मात्र प्रत्यक्ष कामकाजास दि. 01/10/1972 पासुन सुरुवात झाली. त्यावेळेस या बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे तुमसर शहरालगत 5 मैलापुरते मर्यादित होते. सन 1977 मध्ये या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात वाढ होवुन तुमसर तालुक्यातील 150 गावे व मोहाडी तालुक्यातील 108 असे एकुण 258 गावे मिळुन समितीचे कार्यक्षेत्र बनलेले आहे. त्यावेळचे पहिले सभापती श्री. ईश्वरदयालजी पटले यांनी दुरदृष्ट्रीकोन समोर ठेवुन भंडारा रोडवर 6.34 हेक्टर आर जागा खरेदी करुन मार्केट यार्ड उभारणीसाठी लागणा-या मुलभुत सुविधा तयार केल्या. समितीचे सभापती श्री. ईश्वरदयालजी पटले यांनी दि. 01/09/1971 ते 20/09/1984 पर्यंत सभापती पदाची धुरा सांभाळली. दि. 21/02/1984 ते 24/07/1986 पर्यंत श्री. द. सी. आंबटकर व दि. 25/07/1986 ते 23/05/1988 तसेच दि. 24/05/1988 ते 11/07/1988 पर्यंत प्रशासक पदाचा कार्यभार सांभाळला. यानंतर तुमसर बाजार समितीचे विभाजन होवुन तुमसर व मोहाडी अशा दोन बाजार समित्यांची निर्मिती झाली. यामध्ये तुमसर बाजार समितीचे नामनिर्देशित सभापती श्री. माणिकरावजी भुरे व मोहाडी बाजार समितीचे सभापती श्री. आनंदरावजी वंजारी यांनी दि. 12/07/1988 ते 02/09/1990 पर्यंत सभापती पद भुषविले. यानंतर दि. 03/09/1990 ते 31/10/1990 पर्यंत श्री. जि. आर. मारबते, प्रशासक या काळात तुमसर बाजार समितीची निवडणुक होवुन पुन्हा दि. 01/10/1990 ते 10/08/1997 पर्यंत श्री. ईश्वरदयालजी पटले सभापती होते. परंतु याकाळात कृषि उत्पन्न बाजार समिती मोहाडी सक्षम होवु न सकल्यामुळे मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांचे आदेशानुसार मोहाडी व तुमसर बाजार समितीचे एकत्रीकरण होवुन श्री. मयुरध्वजजी गौतम दि. 11/08/1997 ते 10/08/2000 पर्यंत नामनिर्देशित सभापती पद भुषविले. यानंतर संचालक मुदत संपल्यामुळे दि. 11/08/2000 ते 04/12/2000 पर्यंत प्रशासक राजवट राहुन याकाळात बाजार समितीची निवडणुक होवुन सभापती म्हणुन श्री. शिशुपालजी पटले यांनी दि. 05/12/2000 ते 07/12/2005 पर्यंत रुजु होते. दि. 08/12/2005 ते 17/08/2009 पर्यंत विविध प्रशासकांनी बाजार समितीचे कामकाज पार पाडले. याकाळात बाजार समिती तुमसरचे निवडणुक होवुन दि. 18/08/2009 पासुन श्री. भाऊरावजी तुमसरे यांनी सभापती पद दोनदा दि. 19/09/2021 पर्यंत दोनदा सभापती पदावर कार्यरत राहीले. याकाळात बाजार समितीचे मार्केट यार्डवर अनेक विकासकामे झाली. उदा. ॲाक्शन हॅाल, ओपन प्लॅटफार्म, रस्ते, धर्मकाटा, गोदाम, धान्य चाळणी यंत्र इतर विकासकामे झाली. दि. 20/09/2021 ते 28/05/2024 या कारकिर्दमध्ये प्रशासक म्हणुन श्री. आर. सी. चोरघडे, श्री. व्हि. एन. देशपांडे, श्री. आर. टी. अगडे कार्यरत होते. त्यानंतर समितीची निवडणुक होवुन नव्याने तिस-यांदा सभापती म्हणुन श्री. भाऊरावजी तुमसरे दि. 28/05/2024 पासुन कार्यरत आहेत.

समितीकडे सध्या 7.98 हे. आर. जमीन असुन तसेच मोहाडी येथे 6 एकर जमीन असुन शेतकरी बांधवांचे शेतमालास खालील दर्शविल्यानुसार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

अ. क्र. तपशिल
1 एकुण लिलाव ओटे 8 (4 कव्हर्ड, 4 ओपन प्लॅटफार्म)
2 गोदाम (क्षमता 1000 मे. टन) 2 नग
3 व्यापारी/अडते गाळे 71 नग
4 धर्मकाटे (क्षमता 50 मे. टन) 2 नग
5 हमालांकरीता निवास व्यवस्था 20 कमरे
6 शेतकरी उपहारगृह (शिवभोजन थाली)
7 थंड पिण्याचे पाण्याची सोय (आर. ओ. सहित)
8 संपुर्ण वजनमाप ईलेक्ट्रीक काट्यावरती
9 संपुर्ण मार्केट यार्ड परिसर ईलेक्ट्रीफिकेशन
10 जनरेटरची सोय
11 मार्केट यार्डवरील संपुर्ण रस्त्याचे सिमेंटीकरण
12 सर्व ओट्यावर CCTV कॅमे-याची सोय
13 मोहाडी येथील जागेवर 50 मे. टन क्षमतेचे कोल्डस्टोरेज
14 ई- नाम योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी
15 धान्य चाळणी यंत्र
16 सुसज्य असे शेतकरी भवनाची सोय

सन आवक क्विं. उत्पन्न (रु.) खर्च (रु.) वाढावा (रु.) तुट (रु.)
2020-21 426576 1,97,75,058 1,81,09,685 16,65,373 ---
2021-22 378250 1,24,51,918 1,51,04,034 --- 26,52,118/-
2022-23 481886 3,90,85,518 1,98,23,321 1,92,62,197 ---
2023-24 672119 5,31,70,347 2,19,60,450 3,12,09,896 ---
2024-25 817246 4,28,65,147 2,26,69,865 2,01,95,282 ---

वरील दर्शविलेल्या आकडेवारीवरुन मार्केट यार्डवर शेतमालाची आवक वाढतांनी दिसुन येत आहे. तसेच समितीवरती आजपावेतो कोणत्याही बँकाचा किंवा वित्तीय संस्थाचा कर्ज नाही. तसेच अशाप्रकारे कृषि उत्पन्न बाजार समिती तुमसरची प्रगती होण्यास संचालक मंडळ, सन्माननीय खात्याचे अधिकारी, पदाधिकारी व बाजार समितीचे यार्डात काम करणारे अडते/व्यापारी, हमाल, मापारी व कर्मचारी बांधव तसेच शेतकरी बांधव यांचा मोलाचा वाटा आहे.